नवी मुंबई : NMMT बसचालक, वाहकाला मारहाण; किरकोळ कारणावरून वाद | Navi Mumbai News update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police fir

नवी मुंबई : NMMT बसचालक, वाहकाला मारहाण; किरकोळ कारणावरून वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : घणसोली येथून खारकोपरकडे (Ghansoli to Kharkopar) जाणारी एनएमएमटीची बस (NMMT Bus) पुढे जाणाऱ्या कारला किंचित धडकल्‍याने कार चालक व त्याच्या साथीदाराने बसचालक व वाहकाला (Driver and conductor beating case) बेदम मारहाण केल्याची घटना तरघर येथे घडली. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी (NRI Police) मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल (Police FIR) केला आहे.

हेही वाचा: वानखेडे प्रकरणी पुढील आठवड्यापर्यंत 'नो ट्विट्स-नो कमेंट्स': नवाब मलिक

एनएमएमटी बस चालकाचे नाव मारुती सुभाष बटुळे तर वाहकाचे नाव ज्ञानेश्वर पोटे असे आहे. दोघेही घणसोली आगारात कार्यरत असून गत रविवारी ते घणसोली खारकोपर मार्गावरील १८ क्रमांकाच्या बसमध्ये कार्यरत होते. सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घणसोली येथून बस घेऊन खारकोपरच्या दिशेने निघाले असता, तरघर येथे फोर्ड कंपनीच्या कारला बस चालकाने डीपर मारून बाजूला होण्यास सांगितले. मात्र कार चालकाने भररस्त्यात ब्रेक लावल्‍याने बस पुढे असलेल्या कारला किंचित धडकली.

चिडलेल्‍या कार चालक अरविंद पाटील व त्याच्या साथीदाराने बसचालक मारुती बटुळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी बसवाहक ज्ञानेश्वर पोटे वाद मिटविण्यासाठी गेले असता, त्‍यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोघेही कार घेऊन पळून गेले. घटनेनंतर बसचालक व वाहकाने पोलिसांना फोनवर माहिती देऊन रात्री उशिरा एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केळी. त्यानुसार पोलिसांनी अरविंद पाटील व त्याचा साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top