लग्नघरी टाकली धाड, मंडपातूनच उचललं सायबर गुन्हेगाराला

लग्नघरी टाकली धाड, मंडपातूनच उचललं सायबर गुन्हेगाराला
Updated on

मुंबई, ता.20: 'पासपोर्ट इंडिया' या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराला लग्नाच्या मंडपातून अटक करण्यात आली. सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन ही धडक कारवाई केली. या प्रकरणात मोठ्या टोळीचा सहभाग असून त्यांनी देशभरातील अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अनुप शुक्ला असं 29 वर्षीय अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  उत्तर प्रदेशातील औरिया येथील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तक्रारदाराचा स्वतःचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय असून त्याच्या विरोधात भादंवि  420,468,471 सह  माहिती तंत्रज्ञान गैरवापर  प्रतिबंधक कायदा 66(क),66(ड )अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार  संगीता भुजंग यांना  9 जानेवारी 2021 पर्यंत पासपोर्ट नूतनीकरण करायचा असल्याने त्या त्याबाबत ऑनलाईन सर्च करत होते. त्यावेळी त्यांना पासपोर्ट इंडिया नावाचे संकेतस्थळ सापडले.

आरोपीने संकेतस्‍थळावर स्वच्छ भारत अभियानचा लोगो वापर केल्यामुळे तक्रारदार यांनाही संकेतस्थळाबाबत  संशय आला नाही. पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचे त्यांनी  पर्याय निवडल्यानंतर, एका नवीन पानावर निर्देशित केले गेले. तेथे  फी भरण्यासाठी बँकिंग डिटेलसह तिचा वैयक्तिक तपशील विचारला होता. त्यांनी सर्व तपशील सादर केला आणि एक पावती देखील मिळाली.

मात्र त्यांच्या खात्यातून एकूण 2999 रुपये गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुन्हा वेबसाइट शोधत असताना त्यांना  भारत सरकारची पासपोर्टची खरी वेबसाईट सापडली. या वेबसाइटवर त्यांना एक पॉप-अप संदेश दिसला त्यावर  बनावट वेबसाइटद्वारे नागरिकांना लक्ष्य करणार्‍या फसव्या लोकांपासून इंटरनेट वापरकर्त्यांना सतर्क करण्यात आले होते.  

तक्रारदार यांनी ज्या संकेतस्थळावर माहिती भरली होती ती बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी यानंतर बीकेसी सायबर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील मुजफ्फराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  त्यानुसार तात्काळ कारवाई करत लग्नसोहळा असून देखील मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com