

Maharashtra Dams Record 23 Percent Less Water Than Last Year Marathwada Reservoir Storage Comes Under Focus
sakal
मुंबई: राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली असून तीन नोव्हेंबरअखेर राज्यातील ३ हजार ४२ धरणांमध्ये ९६६.६१ टीएमसी म्हणजेच ६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा १,३०८.१० टीएमसी म्हणजे ९० टक्के होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात २३ टक्क्यांची घट झाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील धरणांची स्थिती गंभीर असून काही जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा दहा टक्क्यांच्या आसपास किंवा त्यापेक्षाही कमी आहे.