उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुलांना सांगितलं, तुम्ही...

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुलांना सांगितलं, तुम्ही...

मुंबई - आज तुम्ही विद्यार्थी आहात. त्यामुळे तुमच्याकडे उद्याचे भावी नागरिक म्हणून समाज बघत असतो. म्हणून आपल्या वसुंधरेचे अतिशय चांगल्या प्रकारे रक्षण करायचे आहे.  आपल्याला चांगल्या प्रकारचे वातावरण मिळाले पाहिजे, पुढच्या पिढीला पण ते मिळाले पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे. तो अधिकार पार पाडण्यासाठी आपण झोकून देऊन काम करावे, असे आवाहन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना केले.

शालेय शिक्षण विभाग, पर्यावरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमान आज मंत्रालयात समृध्द पर्यावरण रक्षण संकल्प शपथेचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या रक्षणासाठीचे आवाहन केले. ते म्हणाले की,  विद्यार्थी दशेत शिक्षण घेताना पर्यावरण या गोष्टीचे गांभीर्य समजले पाहिजे म्हणून आज शालेय शिक्षण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम होत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, पर्यावरण मंत्री असेच चांगले उपक्रम राज्यात राबवून  एक चांगला आदर्श ठेवण्याचे काम आपण करू या.

संगणकाच्या क्रांतीमुळे मानवी जीवनाची प्रगती झाली. अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत. सारं जग आज संगणकाच्या माध्यमातून संवाद साधू लागलेलं आहे. मात्र आपण 21 शतकात जात असताना मानवाने आपल्या काही सोयीसाठी ज्या गोष्टी केल्या, परंतु काही निर्णयामुळे आपल्याला पर्यावरणाची काही किंमत आपल्याला मोजावी लागलेली आहे. त्याचे भान राज्यातील सर्व जनतेनी, माझ्या विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे आणि त्यालाच अनुसरून आजची ही समृद्ध पर्यावणाची शपथ आपण घेऊ असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. आणि राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीमध्ये आपण सर्वांनी कायम पर्यावरणाच्या रक्षणाचे भान ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

maharashtra DCM ajit pawar asked students to take active part in environment protection

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com