

Maharashtra Farmers Face Major Drought Crisis With 62000 Crore Crop Loss and 304 Talukas Declared Drought Hit Areas
sakal
मुंबई : मॉन्सूनच्या पावसाने दिलेली ओढ आणि अनियमिततेमुळे यंदा राज्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या ‘प्राथमिक’ अंदाजानुसार, या दुष्काळामुळे राज्यात ६२ हजार कोटी रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. ३५८ पैकी ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, पंचनाम्याची प्रक्रिया आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) छाननीनंतर नुकसानीचा हा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.