

Maharashtra Drought Relief
ESakal
मुंबई : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलांमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची वीजजोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. याबाबत राज्य सरकारने 'महावितरण'ला निर्देश दिले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.