नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करा; कोणी केली आहे ही मागणी वाचा

संजीव भागवत
Monday, 22 February 2021

शालेय शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पास करावे अशी  मागणी इंडिया वाईड पँरेंट्स असोसिएशनने आज केली आहे

मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून अनेक शहरात आणि ग्रामीण भागातही शाळा सुरू ठेवता येतील की नाही याविषयी सांशकत ता निर्माण झाली आहे, त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पास करावे अशी  मागणी इंडिया वाईड पँरेंट्स असोसिएशनने आज केली आहे.

कोरोनामुळे राज्यातील प्रमुख शहरात आणि ग्रामीण भागात ज्या ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत त्या ठिकाणी अद्यापही  शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यात अद्यापही आंख्य  विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित  राहिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमच पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार नसल्याचे सांगत असोसिएशनच्या अध्यक्षा अड. अनुभा सहाय यांनी ज्या प्रकारे आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण आहे. तेच धोरण नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच  कोरोनाच्या परीस्थितीमुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा किंवा विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलावे, जेणेकरून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास ते लवकर सुरू करू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

----------------------

( Edited By Tushar Sonawane )
 

maharashtra education marathi news Pass directly to ninth, eleventh students Demand latest mumbai updates


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra education marathi news Pass directly to ninth, eleventh students Demand latest mumbai updates