esakal | फोन टॅपिंग प्रकरण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी सोडलं मौन..  
sakal

बोलून बातमी शोधा

फोन टॅपिंग प्रकरण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी सोडलं मौन..  

फोन टॅपिंग प्रकरण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी सोडलं मौन..  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सायबर सेलतर्फे ही चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. फोन टॅपिंग झालेल्या नेत्यांमध्ये शरद पवार, दिग्विजय सिंग या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आरोप केले होते दिग्विजय सिंह यांनी:

“मागील सरकारने मला भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदप्रकरणी ‘अर्बन नक्षली’ असल्याचा आरोप केला. मात्र हे एक षडयंत्र असल्याचं सिद्ध झालं होतं. मात्र अनेक कार्यकर्ते अजूनही तुरुंगात आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार? महाराष्ट्रात झालेल्या या हेरगिरीमागे कोण होतं? इस्त्राईलच्या सॉफ्टवेअर कंपनी एनएसओशी बोलण्यासाठी महाराष्ट्रातील कोणते अधिकारी गेले होते. मालवेअरचा उपयोग करुन हेरगिरी करण्यामागे कोण होतं? असे प्रश्न दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केले आहे.

Inside Story - जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस:

दरम्यान या प्रकरणावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मौन सोडलंय. 'फोन टॅपिंग' ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, या प्रकरणाची जरूर चौकशी व्हावी. सरकारने असे कुठल्याही प्रकारचे आदेश दिले नव्हते, ज्या वेळेला हे फोन टॅपिंग झालं असे आरोप केले जातायत त्यावेळला शिवसेनेचेच गृहराज्यमंत्री होते", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलय. " जे लोकं हे आरोप करत आहेत ते किती विश्वासपात्र आहेत हे लोकांना माहीती आहे", असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलय.    

maharashtra ex cm devendra fadanavis clears his stand on phone tapping and snooping case