esakal | Inside Story - जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'
sakal

बोलून बातमी शोधा

Inside Story - जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'

Inside Story - जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  सध्या महाराष्ट्रात वादंग सुरु आहे तो भाजपच्या विरोधातील नेत्यांच्या फोन टॅपिंगमुळे. अशात स्वतः संजय राऊत यांनी त्यांचा स्वतःचा, शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांचा फोट टॅप केला जात होता अशी माहिती माध्यमांना दिली आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या काळात एका अधिकाऱ्याला खास इस्राईलमध्ये पाठवून पेगॅसिस नावाचा स्पायवेअर भारतात आणण्यात आल्याची तक्रार काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेत याबाबत आता चौकशीचे आदेश दिलेत.

यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशात नक्की फोन टॅपिंग कसं केलं जातं ? यामध्ये कशाप्रकारे स्पायवेअर वापरण्यात येतं ? ज्या पेगॅसिस स्पायवेअरचा वापर फोन टॅपिंगमध्ये करण्यात आला ते काय आहे ? जाणून घेऊयात.   

मोठी बातमी - "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

काय आहे पेगॅसिस स्पायवेअर सॉफ्टवेअर ?

पेगॅसिस हे एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. जे इस्राईलच्या सायबरआर्म फर्मच्या या संस्थेने तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर आयफोन आणि अँन्ड्रॉईड या दोघांमध्ये इन्स्टॉल होतं. या सॉफ्टवेअरचा दुरुपयोग करून दुसऱ्यांचे टेक्स्ट मॅसेज आणि फोन टॅप केला जाऊ शकतो. तसंच या सॉफ्टवेअरचा दुरुपयोग करून दुसऱ्यांच्या फोनमधील कॅमेरा आणि मायक्रोफोनममध्ये असेलली माहिती मिळवली जाऊ शकते. या स्पायवेअर सॉफ्टवेअर ची निर्मिती दहशतवादी कारवायांचा आणि गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तयार केला गेलाय असं करण्यात आलंय असं  इस्राईलच्या सायबरआर्म फर्म संस्थेने सांगितलंय. 

ऍपल आयफोनच्या 9.3.5 व्हर्जनमध्ये याबद्दलची सुरक्षा देण्यात आली आहे मात्र अँड्रॉइड फोनसाठी अशा प्रकारची सुरक्षा अजूनतरी देण्यात आलेली नाही.  

मोठी बातमी - फोन टॅपिंगवर संजय राऊत यांचा मोठा खुलासा, भाजपच्याच मंत्र्याने..

कसं होतं टॅपिंग ? 

आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की कोणत्याही माहित नसलेल्या लिंकवर केली करू नका, आपण अनेकदा अशा चुकीच्या लिंकवर क्लिक करतो आणि आपलं फेसबुक, बँक अकाउंट किंवा ईमेल हॅक झाल्याचं आपल्याला समजतं. असाच काहीसा प्रकार यातही वापरण्यात येतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला एक लिंक पाठवली जाते, त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या मायक्रोफोन, कॅमेरा, मेसेजेस, बँकेचे डिटेल्स, ईमेल  या सर्वांचा ऍक्सेस हॅकर्स किंवा फोन टॅपिंग करणाऱ्यांकडे जातो.  

अरब ह्युमन राइट्सचे अहमद मंसूरी यांना एक टेक्स्ट मॅसेज आला. मंसूरी यांना त्या मॅसेजमध्ये एक लिंक देखील आली होती. मंसूरी यांना त्या मॅसेजचा संशय आला आणि त्यांनी तो मॅसेज सिटीझन लॅबला पाठवला. लॅबने या मॅसेज आणि लिंकचा तपास केला. या तपासात हा मॅसेज स्पाय असल्याचं सांगण्यात आलं. जर मंसूरी यांनी ती लिंक उघडली असती तर त्यांचा फोन, मॅसेज आणि इतर माहिती टॅप होण्याची शक्यता होती.

मोठी बातमी - 'बंद'दरम्यान मुंबईत बस फोडली, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

भारतात व्हाटसअप होतं हॅक:

याच सॉफ्टवेअरविरोधात नोव्हेंबेर २०१९ मध्ये फेसबूकच्या NSO विरोधी पथकाने भारतातील काही व्हाटसअप अकाऊंट हॅक केल्याचा गुन्हा नोंदविला होता. काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आणि काही राजकारण्यांचे अकाऊंट हॅक झाल्याचा दावा फकेबुकने केला होता. त्यानंतर आता परत संजय राऊत, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

how phone tapping and snooping is done and things you must know