शेतकरी कर्जमाफी मिळणार पण कंडीशन्स अप्लाय..

संजय मिस्किन
Saturday, 28 December 2019

कर्जमाफीवरून राजकिय धुमशान..

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीची घोषणा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून दोन लाखापर्यंत कर्ज माफी होणार यावरून विरोधकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान संघटनांच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला आहे. 

महत्त्वाची बातमी : 'वर्षा'वरील रेघोट्यांवर संजय राऊत याचं उत्तर, म्हणालेत...    
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. मात्र सरकारने काढलेल्या आदेशात केवळ दोन लाखापर्यंतच कर्जमाफी होईल, दोन लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांना या दोन लाखाचा देखील फायदा मिळणार नाही, असा निर्णय जाहीर केला. 

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांनो मटन खाताय? जरा थांबा, कारण..

या निर्णयाचा सर्व स्तरातून टोकदार विरोध होत असून भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी फसवी असल्याची टीका केली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे कुठल्याच शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही असा घरचा आहेर सरकारला दिला आहे.

महत्त्वाची बातमी : स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला

नव्या कर्जमाफीमध्ये दोन लाखापर्यंत किंवा त्याच्या आत असलेलं सर्व कर्ज माफ होणार आहे. पण दोन लाखाच्या वरती ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांचा वेगळा विचार केला जाईल. त्यांच्यासाठी सरकार लवकरच वेगळी योजना घेऊन येईल असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पण या कर्जमाफीच्या विरोधात सर्व स्तरातील राजकीय नेत्यांनी विरोध केलेला असल्याने सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.

WebTitle : maharashtra farmers will get loan wavier but conditions apply


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra farmers will get loan wavier but conditions apply