
Maharashtra FDA on Coldrif Cough Syrup
ESakal
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्ड्रिफ कफ सिरप (बॅच एसआर-१३)च्या वापरावर तत्काळ बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. एफडीएने राज्यातील सर्व घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि रुग्णालयांना या बॅचमधील सिरप वापरणे थांबवण्याचे आणि जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. कोल्ड्रिफ सिरप खाल्ल्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १२हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.