डोंबिवली - महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, हे संकेत ठाकरे बंधूंनी दिले आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण असून मुंबई ठाणेनंतर आता डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधू एकत्र असल्याचे आनंददायी बॅनर लावण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील गचाळ व गलिच्छ राजकारणासाठी एकत्र या, तुम्ही एकत्र याल तो दिवस दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा दिवस असेल अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे हे अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे. यासाठी तुम्ही पुढे येणार का? या महेश मांजरेकर यांच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं होत की, 'महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत.'
महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त माझी आहे. पण मग बाकीच्या चोरांना कळत नकळत पाठिंबा देणार नाही. त्यांचा छुपा भेटी किंवा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यायची. मग टाळी द्यायची भाषा करा', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू सगळे काही विसरून एकत्र येऊ शकतात असे सुतोवाच दोघा बंधूंनी दिल्यावर राज्यात शिवसैनिक व मनसैनिक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत या दोघा बंधूंना एकत्र आणण्यासाठी अनेक अटकल बांधली गेली. मात्र कोणत्याच प्रयत्नांना यश आले नव्हते.
मात्र सध्याच्या घडीला राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून आम्ही सगळे विसरून एकत्र येऊ शकतो, असे राज ठाकरे म्हणाले. उद्धव यांनी ही त्याला दुजोरा देताच राजकीय खलबत सुरू झाली आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये मात्र यामुळे आनंदाचे वातावरण असून, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने डोंबिवलीत बॅनर झळकविण्यात आले आहेत. निष्ठावंत शिवसैनिक राहुल चौधरी, रोहन पाटील, शशांक इंदुलकर यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत.
काय आहे बॅनर वर संदेश...
महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या...
ठाकरे बंधू महाराष्ट्रातील जनता तुम्ही एकत्र येण्याची आतुरतेने वाट पहात आहे. तुम्ही एकत्र याल तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा दिवस असेल दोघांनी एकत्र आलच पाहिजे ही काळाची गरज आहे.
मराठी माणसासाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रात चाललेल्या गचाळ व नीच गलिच्छ राजकारणासाठी नुसत्या बातमीने बघा सर्व सामान्यातल्या सामान्य माणसाला किती आनंद झालाय आणि जेव्हा हे सत्यात उत्तरेल तेव्हा तर काय होईल हा विचार करा फक्त.
महाराष्ट्रासाठी लवकरच दोन्ही ठाकरे बंधुनी एकत्र यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.