COVID19 ची लागण आहे की नाही समजणार फक्त ५ मिनिटात; राजेश टोपेंची मोठी घोषणा

COVID19 ची लागण आहे की नाही समजणार फक्त ५ मिनिटात; राजेश टोपेंची मोठी घोषणा

मुंबई - दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय. अशात आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठी घोषणा केलीये. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. या रॅपीड टेस्टमुळे प्राथमिक चाचणीतच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे का ते समजू शकणार आहे. आपलं रक्त घेऊन अवघ्या पाच मिनिटात संबंधित संशयित रुग्णाला कोरोनाची लागण झालीये की नाही हे समजू शकणार आहे. 

“रॅपीड टेस्टमध्ये आपलं रक्त घेतलं जातं. रक्त घेतल्यानंतर या रक्ताची टेस्ट केली जाते , यातून अवघ्या पाच मिनिटात आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का हे समजू शकतं. यावरून तुम्हाला कोरोनाची लागण झालीये का नाही हे निदान करण्यासाठी होऊ शकतो. यावरून संशयित रुग्णाला घरी क्वारंटाईन करायचंय इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचंय का आयसोलेशन करायचंय याचा तात्काळ निर्णय घेता येणार आहे. यामुळे संशयित रुग्णांवर तात्काळ उपचार सुरु होऊ शकणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधला. महाराष्ट्र केंद्राने दिलेल्या सर्व सूचना योग्य प्रकारे पाळत असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात सध्याची प्रति दिवशी पाच हजार टेस्ट्सची क्षमता असल्याचंही राजेशी टोपे म्हणालेत. 

maharashtra gets permission to conduct rapid test for covid 19 now result will come in 5 minutes

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com