esakal | Big Breaking - परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचा घर वापसीचा मार्ग होणार मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

Big Breaking - परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचा घर वापसीचा मार्ग होणार मोकळा

परदेशात अडकलेले भारतीय नागरिक सरकारकडे वेळोवेळी त्यांना परत घेऊन येण्याबाबत विनंती करत आहेत. मात्र आता राज्य सरकारनं परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Big Breaking - परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचा घर वापसीचा मार्ग होणार मोकळा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलं आहे. चीनमधून पसरलेला हा व्हायरस आता संपूर्ण जगभरात हाहाकार माजवत आहे. देशातही सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परदेशात अडकलेले भारतीय नागरिक सरकारकडे वेळोवेळी त्यांना परत घेऊन येण्याबाबत विनंती करत आहेत. मात्र आता राज्य सरकारनं परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

 परदेशातल्या महाराष्ट्रात वास्तववास असणाऱ्या लोकांना परत आणण्यासाठी सरकारनं त्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून संबंधितांची माहिती घेतली जाणार आहे. ज्यामुळे त्यांना लवकरात लवकरात लवकर  मायदेशात आणण्यात येणार आहे. 'मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या मात्र आता लॉकडाऊनमध्ये परदेशात अडकलेल्या नागरिकांनी हा फॉर्म भरावा. हा फॉर्म भरणाऱ्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला दिली जाईल आणि अशी माहिती  लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच या लोकांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याकडे पाठपुरावा केला जाईल' अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

खरंच नियमित पान खाल्ल्याने 'ती'  पावर वाढते का ?  

राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अडकलेल्या मजुरांसाठी राज्य सरकारकडून विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. परदेशात  अडकलेले शेकडो महाराष्ट्रीय नागरिक राज्यात परत येण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत होते. त्यामुळे राज्य सरकारनं त्यांना आता परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मद्यप्रेमींचा हिरमोड, 'या' जिल्ह्याच्या शहरी भागात दारूबंदी कायम

परदेशात अडकलेल्या नागरिकांना देशात परत येण्यासाठी राज्य सरकारनं तयार केलेला फॉर्म भरणं अनिवार्य असणार आहे. या  फॉर्ममध्ये परदेशात अडकलेल्या नागरिकांना आपलं नाव, ई मेल, लिंग, सध्या राहत असलेल्या देशाचा कोड नंबर, स्वत:चा संपर्क क्रमांक, सध्या राहत असलेलं शहर, देश आणि खंडाचं नाव, तिथे केलेल्या प्रवासाचं कारण अशी माहिती भरायची आहे.  तसंच  पासपोर्ट क्रमांक, व्हिसाचा प्रकार आणि व्हिसाची अंतिम मुदत  यासंबंधीची माहितीही देणं अनिवार्य असणार आहे.

हा फॉर्म भरल्यानांतर राज्य सरकार केंद्र सरकारकडे या नागरिकांना परत आणण्याबाबत प्रयत्त्न करणार आहे. त्यामुळे ही परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.

maharashtra government is people who are stuck outside india and from maharashtra

loading image
go to top