
मुंबई : महाराष्ट्र सरकार सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन कर्नाटकात सुरू आहे, तिथे मराठी भाषकांचा मेळावाही घेता येणार नाही, अशी संकुचित भूमिका घेण्यात आली आहे. पण बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही, तोपर्यंत सीमा भागासाठी आमचा लढा सुरू राहील, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद व्यक्त केला.