

Force One Under Maharashtra ATS Control Home Department Approves Move to Improve Counter Terrorism Operations and Efficiency
sakal
मुंबई : उच्च जोखमीच्या दहशतवादी घटनांना तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’ चे पथक आता दहशतवाद विरोधी पथकाच्या नियंत्रणात काम करणार आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यामुळे ‘फोर्स वन’चे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण आता दहशतवाद विरोधी पथकाकडे असणार आहे.