esakal | मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist

मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा (terror attack) कट उधळून लावला. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशातून सहा जणांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रातून अटक केलेला जान महंम्मद शेख उर्फ समीर कालिया हा सोमवारी सायंकाळपर्यंत मुंबईतच होता, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! सहा दहशतवादी अटकेत; देशभरात करणार होते घातपात

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि संबंधितांना बैठकीमध्ये बोलावले आहे. त्यांच्याकडून माहिती घेण्यात येणार आहे. हे देशाच्या स्तरावरील अंत्यत संवेदनशील आणि गंभीर प्रकरण आहे. बैठकीमधून सर्व माहिती घेऊन नेमकं काय झालंय? हे सांगता येईल, असे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातून अटक केलेला जान शेख हा मुख्य सूत्रधार?

पाकिस्तानमधील एका दहशतवादी मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांनी भांडाफोड केला होता. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसहित एकूण सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा संहार घडवून आणण्याचा त्यांचा मोठा कट होता. यामधील सगळे आरोपी हे देशभरात मोठा हाहाकार माजविण्याच्या तयारीत होते. दिल्ली पोलिसांनी जान महंमद शेख याला अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र एटीएसनेही जान शेख याच्या सायन येथील घरी धाड टाकली. जान शेख याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. धारावी पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले होते. चौकशीनंतर कुटुंबाला सोडण्यात आलं आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जान शेख हा मुख्य सुत्रधार आहे. हाच जान शेख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. एवढंच नाहीतर जान शेख 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्यांना देखील अटक करण्यात आलं आहे.

loading image
go to top