

HSC Result
ESakal
मुंबई : राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आपल्या नियोजित वेळेपूर्वीच शनिवारी (ता. २) जाहीर झाला. यात मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या तीन लाख २३ हजार ५०१ नियमित विद्यार्थ्यांपैकी दोन लाख ९१ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९०.०८ टक्के इतका आहे.