

Maharashtra Cold Weather Update
ESakal
मुंबई : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. मुंबईत दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला तरी पहाटेच्या किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना गुलाबी थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे. दरम्यान, राज्याच्या उर्वरित भागातही पारा घसरला असून जळगावमध्ये ९.२ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.