लॉकडाउनसंबंधी मंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं विधान

लॉकडाउनसंबंधी मंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं विधान

कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असताना लसतुटवडा निर्माण झाला. तशातच दररोज राज्यात ५०हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाउन लागणार की नाही? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. राज्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल माहिती दिली. "मुख्यमंत्र्यांनी रविवारी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. आजदेखील ते काही लोकांशी चर्चा करत आहेत. विविध समित्यांच्या सदस्यांशी चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित झाले. बैठकीत कष्टकरी कामगारांसाठी पॅकेज जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. पण एक मात्र नक्की की आता साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नाही. त्यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. कारण लोकांचा जीव वाचवणे ही राज्य सरकारची प्राथमिकता असेल", असं स्पष्ट मत राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

"राज्यात कोविडमुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनावर उपायकारक ठरणारे रेमडेसिवीर हे औषध सध्या राज्यात मिळणं कठीण होत आहे. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्याशिवाय राज्यात ऑक्सिजनचादेखील तुटवडा येत चालला आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी करण्यात आली आहे. त्याचसह कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करणे आणि वैद्यकीय सुविधा वाढवणे हे सध्या राज्यापुढे आव्हान असणार आहे", असे ते म्हणाले.

सक्रिय रूग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक

दरम्यान, मुंबईसह राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून सक्रिय रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढू लागला आहे. लवकरच मुंबईत एक लाख सक्रिय रुग्णांचा टप्पा पार होण्याची भीती आहे. दर दिवशी मुंबईत 9 ते 10 हजारांच्या दरम्यान कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातच सक्रिय रुग्ण दुपटीने वाढत आहेत. सद्यस्थितीत मुंबईत 92 हजार 464 एवढे सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दर दिवशी किमान हजारांनी सक्रिय रुग्ण वाढत आहेत. 10 एप्रिल या दिवशी मुंबईत 91,108 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 11 एप्रिलला ही संख्या 1,356 ने वाढून 92 हजार 464 एवढ्यावर पोहोचली. तर, 9 एप्रिलला 90 हजार 333 सक्रिय रुग्ण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com