मनसेचा बडा पदाधिकारी म्हणतोय "राऊतसाहेब... तर मी तुमच्या पाया पडेन", वाचा नक्की झालंय काय

मनसेचा बडा पदाधिकारी म्हणतोय "राऊतसाहेब... तर मी तुमच्या पाया पडेन", वाचा नक्की झालंय काय

मुंबई- अभिनेता सोनू सूद यानं केलेल्या कामावर रविवारी सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली आहे. सोनूनं लॉकडाऊनच्या काळात इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केले. संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेते राम कदम यांनी पलटवार केला. त्यानंतर मनसेनं देखील संजय राऊतांना टोला लगावला आहे. मात्र आता पुन्हा एकदा मनसे नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. 

जर आपण कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलात, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हणत संदीप देशपांडे राऊतांवर टीका केली आहे.

राऊतसाहेब सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कोरोनाची टेस्ट नीट होत नाहीत. जर टेस्ट झाल्या तर रुग्णवाहिका मिळत नाहीत. रुग्णवाहिका मिळालीच तर सरकारी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाहीत. जागा मिळालीच तर रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे. खासगी रुग्णालयांचं बिल परवडत नाही. खासगी रुग्णालय वाटेल तितके बिल आकारत आहेत. अशी सध्या रुग्णांची अवस्था आहे. 

मला असं वाटतं ही परिस्थिती सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता. सामान्य जनतेला दिलासा देण्याचं हे काम तुम्ही केलं तर सामनाच्या कार्यालयात येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे,' असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

अमेय खोपकरांची ही टीका 

मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटरवरुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. माननीय संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत? ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया...
मनाचा मोठेपणा दाखवुया...असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार...  असं ट्विट खोपकर यांनी करत त्यांना टोला लगावला. एवढंच काय तर ट्विटच्या शेवटी हॅगटॅग #बसारडत असं देखील लिहिलं आहे.  

लेखात काय म्हटलं संजय राऊतांनी

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी सोनू सूद प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. 

ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न 

महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’,बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.

maharashtra lockdown politics shivsena MNS stands head to head on sonu sood matter

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com