केवळ क्वारंटाईन नव्हे तर इथे रुग्णांचा कोरोना ताणही केला जातो कमी, कसा ? असा...

केवळ क्वारंटाईन नव्हे तर इथे रुग्णांचा कोरोना ताणही केला जातो कमी, कसा ? असा...

मुंबई - काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मुंबईत एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने कोविड सेंटरमध्ये मेडिटेशन सेशन्स घ्यायला सुरुवात केली आहे. वरळी डोम इथल्या रुग्णांसाठी मेडिटेशनचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 

कोरोनामुळे येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी वरळीच्या एनएनसीआय कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी मेडिटेशन थेरेपी सुरु करण्यात आली आहे. पालिकेकडून मुंबईच्या प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये मेडिटेशन थेरेपी सुरू केली जाणार आहे. कोरोनामुळे डीप्रेशनमध्ये जाणाऱ्या कोरोना रुग्णांना या थेरेपीचा फायदा होऊ शकतो असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. 

योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशनने झुम ऍपच्या मदतीने हे मेडिटेशन सेशन्स घेतले जात आहेत. शारीरिक आजारांपेक्षा कोरोनाची भीती लोकांमध्ये जास्त आहे. कोरोना रुग्णांना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये 24 तास रहावं लागतं. आजूबाजुला ही कोरोना रुग्ण असतात. या सर्व रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात, काही दिवसांपूर्वी नायर रुग्णालयामध्ये एका कोरोना रूग्णाने आत्महत्या केली होती. काही जण पळून जातात. म्हणजे 14 दिवस नुसतं पडून राहणं हे एवढं सोपं काम नाही. त्यांच्या डोक्यातील विचारणा चालना देण्यासाठी असे उपक्रम राबवले जात आहेत. आपण काही योगा शिक्षक ही इथे आणणार आहोत. कोविड सेंटर मधील रुग्णांनी प्राणायम, योगा कसा करायचा तो ही तिथे शिकवला जाणार आहे. काही ठिकाणी गाणारी लोक, जादू करणारे जादुगार अश्या लोकांना ही बोलावणार आहोत. त्यांचा विरंगुळा होण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. सर्व वॉर्ड ऑफिसर्सला याबाबत सांगितले आहे. 

इतर ही कोविड सेंटरमध्ये सुरु होणार उपक्रम -

मुंबईच्या प्रत्येक कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये ध्यान धारणेचा म्हणजेच मेडिटेशनचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. लवकरच पोद्दार रुग्णालय आणि भायखळयात हा उपक्रम सुरु होईल. या कोविड सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या एलईडी आणि वायफायमुळे हे सेशन्स घेणे सोपे होणार आहे. कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मकतेचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे डीप्रेशन येणं ही समस्या दिसून येते. त्यामूळे, त्यांना आधी योगा, प्राणायम आणि ध्यानाची साधना दिली जाते. ज्यामुळे त्यांना कोरोनापासून लढण्याची शक्ती मिळेल असं योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशनचे डॉ. अभय यादव सांगतात. 

meditation therapy to keep covid 19 patients mentally healthy and fit

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com