Mumbai Crime News: धक्कादायक! घरासाठी लागणार होते तब्बल 23 लाख; पैशासाठी 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन केली हत्या!

Mumbai Crime News: पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsEsakal

Mumbai Crime News: गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईजवळ असलेल्या ठाण्यात शेजाऱ्यांनी एका ९ वर्षांच्या मुलांचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. यानंतर मुलाच्या वडिलांकडून 23 लाख रुपयांची खंडणी मागितली. पण पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी ९ वर्षीय इबाद बुबुरे याची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या मागे लपवून ठेवला.

संध्याकाळची नमाज अदा करून ९ वर्षीय इबाद मशिदीतून बाहेर येताच त्याचे अपहरण करण्यात आले. इबाद घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर इबादचे वडील मुद्दसिर यांना फोन आला, फोन करणाऱ्याने सांगितले की, तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर 23 लाख रुपये द्या. यानंतर फोन करणाऱ्याचा फोन बंद झाला.

Mumbai Crime News
Nashik Crime News : चोरांनो, या पिंपळगावमध्ये आपले स्वागत! वाढत्या घरफोड्या पोलिसांपुढे आव्हान

याबाबत मुद्दसीर यांनी पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत इबाद बेपत्ता झाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. पोलीस आणि परिसरातील लोक मिळून इबादचा शोध घेत होते.

त्यानंतर अपहरणकर्त्याने मोबाईलमध्ये दुसरे सिमकार्ड टाकून कॉल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच पोलिसांना त्याचे ठिकाण कळले. पोलिसांनी त्याच गावात राहणाऱ्या सलमान मौलवी नावाच्या तरुणाच्या घराची झडती घेतली. यावेळी इबादचा मृतदेह घरामागील परिसरात एका पोत्यात आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी सलमान, सफुयानसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस कुटुंबीयांकडे तपास करत आहेत.

Mumbai Crime News
Jalgaon Crime News : पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे जळगावात ड्रग्जचे रॅकेट‌

याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून सलमान मुख्य आरोपी आहे. ठाणे (ग्रामीण) एसपी डीएस स्वामी म्हणाले की, या प्रकरणातील सर्व आरोपी ताब्यात असून आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com