
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात तणावाचे वातावरण आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाचा चौथा दिवस सुरू केला आहे. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागणीवर आणि त्यांच्या टीकेवर स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. "कितीही शिव्या दिल्या, उपहास केला तरी मी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आणि कायद्याच्या बाहेर जाणार नाही," असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.