esakal | वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे नवीन वय माहितेय का ?
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे नवीन वय माहितेय का ?

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (Medical Facilities) , गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील (Insurance Policy) महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे (Retirement Age) वय 62 वर्षापर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Minister Meeting) कार्योत्तर मान्यता देण्यात आली. ( Maharashtra Medical officers group A retirement age limit up to sixty two years )

हेही वाचा: शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले - प्रसाद लाड

सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची आवश्यकता आहे. त्यांचा अनुभव साथरोग नियंत्रणात महत्वाचा ठरु शकतो. याचा विचार करुन शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी (वेतनस्तर एस-23 : 67700-208700 व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ (वेतनस्तर एस-20 : 56100-177500) यांचे निवृत्तीचे वय 31 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी 62 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास कार्योत्तर मंजुरी देण्याचा तसेच त्याअनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 10 मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

loading image