esakal | "सुधीरभाऊ, भित्रा ससा परवडला पण उद्धव ठाकरे नाही परवडणार"
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

"सुधीरभाऊ, भित्रा ससा परवडला पण उद्धव ठाकरे नाही परवडणार"

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "आमच्या सहकाऱ्यांनी विधानसभेत ओबीसी आरक्षणासाठी (obc reservation) जे केलं, त्याचा आभिमान आहे. आमचे सहकारी जनतेसाठी लढले आणि निलंबित झाले. हिंदूह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा या सरकारचा मुख्यमंत्री आहे. पण असं असताना, एवढं डरपोक सरकार कसं असू शकतं, असा माझ्यासारखा जुना शिवसैनिक विचार करतो" अशी टीका आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी विधिमंडळाच्या आवारातील अभिरुप विधानसभेत बोलताना केली. (Maharashtra monsoon assembly session 2021 Nitesh rane salm uddhav thacekeray)

"बाळासाहेब मुंबईत बसून देशाला हाक द्यायचे. त्यांची प्रतिमा वाघ म्हणून होती. सुधीर भाऊ म्हणाले होते की, ससा सर्वात भित्रा प्राणी आहे. सुधीरभाऊ मी म्हणतो ससा परवडला पण उद्धव ठाकरे नाही परवडत. अशा पद्धतीचा भित्रा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात सापडणार नाही" अशी टीका नितेश राणेंनी केली.

हेही वाचा: अरे देवा... नसलेल्या बंगल्याच्या भाड्यासाठी मोजले ५० हजार!!

"भित्रे लोकं सर्व आयुध बंद करतायत. त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही. महाराष्ट्राची लुटमार करणारं सरकार महाराष्ट्रात आहे. आज कुठल्या बाबती भ्रष्टाचार नाहीय. बीएमसीतल्या एका वाझेबद्दल बोललो. मुंबई महापालिकेत कुठे भ्रष्टाचार होत नाहीय. भ्रष्टाचार करणारे कलानगरमध्ये जमा झाले असतील, तर उर्वरित मुंबईत काही राहत नाही" असे नितेश राणे म्हणाले. "ऑक्सिजन प्लांटसाठी ८४ कोटीचं टेंडर निघालं. हे टेंडर कोणला दिलं? भायखळ्यात पेंग्विन आणणाऱ्या कंपनीला टेंडर दिलं" असा आरोप त्यांनी केला.

loading image