

Mumbai Rain
esakal
Heavy Rain Paralyses Mumbai Roads and Suburbs : महाराष्ट्रात मान्सूनने पूर्ण जोर धरला असून, मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांचे रूपांतर तलावात झाल्याने सकाळी कामावर निघालेल्या लाखो मुंबईकरांना मोठी गैरसोय सहन करावी लागली.