पावसाळी अधिवेशनाआधी मंत्र्यांसह तब्बल २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

पूजा विचारे
Monday, 7 September 2020

पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात खबरदारी म्हणून प्रत्येकांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. 

मुंबईः विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होतंय.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात खबरदारी म्हणून प्रत्येकांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, तब्बल ४१५ जणांची चाचणी घेतली गेली त्यातल्या २१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यात काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सचिव मंत्री,  विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह टेस्ट आढळल्यामध्ये मंत्रालय अधिकारी कर्मचारी विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांचे लोक देखील असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या लोकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यांना विधिमंडळ अधिवेशनात सहभागी होता येणार नाहीय. 

अधिक वाचाः  ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, आरोग्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षांसह अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे. 

विधानभवनात घेण्यात आलेल्या कोविड चाचणीचे अपडेट 

 • स्वॅब टेस्ट-एकूण चाचण्या : ४१५
 • पॉझिटिव्ह: २१
 • ई डेस्क (VIP): ३ यात सचिव आणि आमदार चाचणी केली आहे.
 • ए डेस्क:७
 • बी डेस्क: ३
 • सी डेस्क: २
 • डी डेस्क: ६
 • ई-  मंत्री सचिव
 • डी - मंत्रालय अधिकारी कर्मचारी
 • सी - विधीमंडळ कर्मचारी
 • डी - इतर ( यात काही आमदार तसच अधिकारी यांनी ही टेस्ट केली होती. )
 • ए - प्रेस
 1. पहिल्या दिवशी  १७०० चाचण्या घेण्यात आल्या त्यामध्ये ३७ जण पॉझिटिव्ह सापडले.
 2. दुसऱ्या दिवशी ४१५ चाचण्या घेतल्या त्यात २१ जण पॉझिटिव्ह आढळले. 
 3. दोनही दिवसात आमदार कक्षात १४ जण तर अति महत्त्वाच्या कक्षात ७ जण पॉझिटिव्ह आढळून आलेत. 

Maharashtra Monsoon Session Start Today 21 Minister Corona Positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Monsoon Session Start Today 21 Minister Corona Positive