Pratap Sarnaik Diwali salary announcement
esakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले (ST Employees to Receive Salary Before Diwali 2026) असून, शासनाने सप्टेंबरमधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ३९१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.