esakal | मुंबई आणि उपनगरात आज पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई आणि उपनगरात आज पावसाची शक्यता

नवी मुंबई, पनवेल भागात पावसाने लावली हजेरी

मुंबई आणि उपनगरात आज पावसाची शक्यता

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुंबई :  महाराष्ट्रातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामध्येच आज मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.  विशेष म्हणजे नवी मुंबई, पनवेल या भागातील काही ठिकाणी पावसाला सुरुवातदेखील झाल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर पश्चिमी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे  जमिनीकडे ७०% पेक्षा जास्त आद्रता निर्माण झाली आहे. त्यामुळेच ढग जमा होऊन मुंबई व उपनगरामध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वातावरण दररोज बदल होत आहे. त्यांमुळे उकाड्यामुळे सगळेच जण त्रस्त झाले आहेत. यामध्येच पावसाच्या सरी कोसळणार असल्यामुळे एकीकडे समाधानाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मात्र, अवकाळी पाऊस पडणार असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम अंब्यांच्या पिकांवर होण्याची दाट शक्यता असल्याचं दिसून येत आहे.
 

loading image