मनसे वर्धापन दिन:  वडाळा मतदारसंघात नागरिकांना मिळणार 'ही' सवलत

मनसे वर्धापन दिन:  वडाळा मतदारसंघात नागरिकांना मिळणार 'ही' सवलत

मुंबई: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना बसू लागल्या आहेत. याचा धागा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वडाळा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा 15 वा वर्धपान दिन सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार विभागातील वाहनचालकांना 9 मार्च रोजी प्रति लिटर 15 रुपये सवलतीमध्ये पेट्रोल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धपान दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या नागरिकांना दिलासा देण्याचा विचार वडाळा विधासभा विभाग अध्यक्ष आनंद प्रभू यांनी केला आहे. त्यानुसार वडाळा विधानसभा मतदारसंघातील मतदार वाहनचालकांना पक्षाच्या 15 व्या वर्धपान दिनानिमित्त प्रति लिटर 15  रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विभागामध्ये रविवारपासून टोकन देण्यास सुरुवात झाली असून दुपारपर्यंत सुमारे 2 हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. तसेच वडाळा विधानसभा क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांची यादी या टोकनसोबत नागरिकांना देण्यात येत आहे.

टोकन घेणाऱ्या व्यक्तींना 9 मार्चला सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत पेट्रोल पंपांवर ही सवलत मिळणार आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीने हैराण झालेल्या वाहनचालकांना पक्षाच्या वर्धपान दिनानिमित्त दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे, शाखा अध्यक्ष मयूर सारंग यांनी सांगितले. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाहीत. पण लोकांनी नाकारलेल्या व्यक्तीकडून नागरिकांना दिलासा देण्यात येत असल्याचे, प्रभू यांनी सांगितले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra Navnirman Sena 15th anniversary day Wadala constituency Will celebrate different way

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com