

Maharashtra Cab Rules
ESakal
आता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांसाठी बुक केलेल्या कॅब राईड्स मनमानीपणे रद्द केल्यास चालकांना मोठा दंड भरावा लागेल. राज्य सरकारच्या नवीन ॲग्रीगेटर धोरणांतर्गत, अशा बुकिंग्स रद्द केल्याबद्दल सामान्य दंडापेक्षा पाचपट अधिक दंड आकारला जाईल आणि वसूल केलेली रक्कम थेट प्रवाशाच्या ॲप खात्यात जमा केली जाईल.