esakal | OBC Reservation : भाजपाचे कल्याण मध्ये सरकार विरोधात आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

OBC Reservation : भाजपाचे कल्याण मध्ये सरकार विरोधात आंदोलन

OBC Reservation : भाजपाचे कल्याण मध्ये सरकार विरोधात आंदोलन

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे आज 15 सप्टेंबर रोजी कल्याण तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत.

इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला महाविकास आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत . ओबीसी आरक्षण समवेत विविध विषयांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असून आज बुधवार ता 15 सप्टेंबर रोजी कल्याण तहसिलदार कार्यालय समोर भाजपच्या वतीने आंदोलन केले.

हेही वाचा: दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण

भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे , आमदार रविंद्र चव्हाण , माजी आमदार जगन्नाथ पाटील, नरेंद्र पवार, मनोज राय, प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, समवेत शेकडो भाजपा माजी नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्ला बोल केला.

loading image
go to top