

Maharashtra OBC Welfare News Bawankule Pushes 6840 Crore Funding for Scholarships Hostels and Student Welfare Schemes
sakal
मुंबई : राज्यातील अठरा पगड जाती आणि ओबीसी घटकांना न्याय देण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व वसतिगृह बांधकामासाठी सहा हजार ८४० कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्याचा निर्णय महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.