esakal | महाराष्ट्र पोलिसांसाठी खुशखबर, लॉकडाऊननंतर पोलिसांना मिळणार...
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र पोलिसांसाठी खुशखबर, लॉकडाऊननंतर पोलिसांना मिळणार...

कोरोना संकट दूर होताच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात येणार आहे. या संदर्भात अहवाल तयार करून तो गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षिस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र पोलिसांसाठी खुशखबर, लॉकडाऊननंतर पोलिसांना मिळणार...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : जगभरात कोरोना थैमान घालतोय. अशात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आलंय. भारतात देखील कोरोना आपला विळखा घट्ट करतोय की काय असा प्रश्न विचारला जातो. भारतात १४ एप्रिल पर्यंत "लॉकडाऊन' सुरु असणार आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसदल अहोरात्र मेहनत घेतायत. 

याचीच दखल राज्य सरकारने घेतली असून कोरोना संकट दूर होताच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात येणार आहे. या संदर्भात अहवाल तयार करून तो गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बक्षिस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

चिंताजनक : मुंबईतील कांजूरमार्गमध्ये प्रशासनाने केल्या 20 चाळी सील

देशांत कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलं असतानाही काही नागरीक नियम तोडत आहेत. त्यामुळे पोलिसांना अशा व्यक्तींविरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे. त्यामुळे पोलिस  टीकेचे धनी ठरले आहेत. तरीही ते डोळ्यात तेल घालून अहोरात्र त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे दलातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.

दिलासादायक : कोरोनाच्या उच्चाटनासाठी 'प्लाझमा डिराइव्ड थेरपी' ठरेल गेम चेंजर ?

पोलिस दलाच्या कर्तव्यनिष्ठेची वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकारने वेळोवेळी दखल घेतली आहे. आता लॉकडाऊन काळात उत्कृष्ठ कामगिरी बजाविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल पोलिस आयुक्तांना पाठविण्यास सांगितला आहे. त्याआधारे कोरोनाचे संकट दूर होताच या अधिकाऱ्यांना योग्य ते पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

maharashtra police will ger rewards after working in crucial period of pandemic covid 19   

loading image