कोरोनाच्या उच्चाटनासाठी 'प्लाझमा डिराइव्ड थेरपी' ठरेल गेम चेंजर ?

कोरोनाच्या उच्चाटनासाठी 'प्लाझमा डिराइव्ड थेरपी' ठरेल गेम चेंजर ?

मुंबई : कोरोनामुळे जगभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसंच जगातल्या काही बलाढ्य देशांनाही कोरोनानं अक्षरशः रडकुंडीला आणलंय. त्यात अजूनही कोरोनावर लस किंवा औषध न सापडल्यामुळे डॉक्टरांची आणि शास्त्रज्ञांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी इबोला नावाच्या रोगावर एका थेरपीनं उपचार करण्यात आले होते. त्यामुळे आता ही थेरपी कोरोनावरही कामी येईल का? या गोष्टीचा शोध शास्त्रज्ञ घेतायेत.

कोणती आहे ही थेरपी ?

या थेरपीचं नाव 'प्लाझमा थेरपी'. इबोला नावाच्या व्हायरसनं जेव्हा जगात थैमान घातलं होतं तेव्हा या थेरपीचा उपयोग या रोगाचा उपचार करण्यासाठी करण्यात आला होता. या थेरपीमुळे तुमच्या शरीरात असणारे अँटीबॉडीज वाढवल्या जायच्यात आणि यामुळे शरीरातून व्हायरस कमी होण्यास मदत होत होती. ही थेरपी आता कोरोनावरही काम करेल यासाठी शास्त्रज्ञांकडून प्रयत्न केले जात आहेत.

या थेरपीमध्ये काही बदल करून जर शास्त्रज्ञ कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही थेरपी विकसित करण्यात यशस्वी झाले तर हे कोरोना विरुद्ध खूप मोठं पाऊल ठरू शकतं. विशेष म्हणजे कोरोनामुळे सिरीयस असणाऱ्या वृद्ध व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी या थेरपीचा उपयोग होणार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरसचा शिरकाव होतो तेव्हा त्यांच्या शरीरात अँटोबॉडीज तयार होतात. ज्या या व्हायरसचा सामना करतात. प्लाझमा थेरपीमुळे या अँटीबॉडीजमध्ये वाढ होते आणि तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढू शकते.

या अँटीबॉडीज आपल्या रक्तात हा व्हायरस निघून गेल्यानंतरही अनेक दिवस राहतात त्यामुळे हा व्हायरस तुमच्या शरीरात पुन्हा प्रवेश करू शकत नाही. म्हणजेच तुमची रोगप्रतिकारक क्षमता व्हायरस निघून गेल्यानंतरही कायम राहते.

सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञ या प्लाझमा थेरपीवर काम करत आहेत. प्लाज्मा थेरपीत काही बदल करून कोरोनापासून बचाव केला जाऊ शकतो असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.  वैद्यकीय भाषेत या थेरपीला प्लाझमा डिराइव्ड थेरपी असं म्हंटलं जातं. यात दुसऱ्यांच्या शरीरातून अँटीबॉडीज काढून तुमच्या शरीरात त्या इंजेक्ट केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्हीही कुठल्याही व्हायरसपासून स्वतःचा बचाव करू शकता. या प्रक्रियेला 'पॅसिव्ह इम्युनिटी' असं म्हणतात.

कोरोना हा व्हायरस एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे शरीरात पसरतो आणि प्लाझमा थेरपीनं निर्माण झालेल्या अँटीबॉडीज तुम्हाला या रोगापासून दूर ठेवण्यासाठी मदत करू शकतात. म्हणून प्लाझमा थेरपी कोरोनापासून बचावासाठी कामात येऊ शकते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

मात्र या अँटीबॉडीज तुमच्या शरीरात जास्त काळापर्यंत राहू शकत नाहीत. अँटीबॉडीज स्वतःहून शरीरात तयार होणं गरजेचं असतं. त्यामुळे शास्त्रज्ञ यात बदल करून कोरोनासाठी या थेरपीचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता कोरोनाबाधितांसाठी प्लाझमा थेरपी किती उपयोगी ठरते हेच बघावं लागणार आहे.

plasma derived therapy will become game changer in fight against corona 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com