esakal | मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा उशिरा राजीनाम्याने फाटला; भाजपची जळजळीत टीका

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा उशिरा राजीनाम्याने फाटला; भाजपची जळजळीत टीका}

इतक्या उशिरा संजय राठोड यांचा राजिनामा घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा पूर्णपणे फाटल्याची टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा उशिरा राजीनाम्याने फाटला; भाजपची जळजळीत टीका
sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई - इतक्या उशिरा संजय राठोड यांचा राजिनामा घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा पूर्णपणे फाटल्याची टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

राठोड यांच्या राजिनाम्याचे वृत्त येताच भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. एवढ्या उशिरा घेतलेला राजिनामा म्हणजे, टू लिटिल टू लेट, अशा स्वरुपाचे काम आहे, अशी टीका भातखळकर यांनी त्यात मुख्यमंत्र्यांवर केली आहे. 

या प्रकरणात गेले अठरा दिवस पुरावे नष्ट करण्याचे काम झाले याला जबाबदार कोण, हा प्रश्न आम्ही उद्या विधीमंडळ अधिवेशनात विचारणार आहोत. याप्रकरणी ताबडतोड एफआयआर दाखल करून संबंधितांना कोठडीत घ्यावे. संजय राठोड, अरुण राठोड असतील वा एका तरुणीचा मध्यरात्री गर्भपात करणारे शल्यचिकित्सक असतील, या सर्वांचा कबुलीजबाब घ्यावा, अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

यातूनच पूजा चव्हाण प्रकरणातील सत्य बाहेर येईल. तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही व या विषयावरील आंदोलनही थांबवणार नाही. उद्यापासून सुरु होत असलेल्या विधीमंडळ अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित केला जाईल, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

-----------------------------

( Edited by Tushar Sonawane )

maharashtra political updates bjps criticism on sanjay rathod resignation politics live news