मुख्यमंत्री शिवसेनेचाच; राष्ट्रवादीच्या अधिकृत नेत्याची घोषणा

टीम ई-सकाळ
Thursday, 14 November 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी सविस्तर खुलासा केला आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पण, सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महाशिवआघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस यांचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातही मुख्यमंत्रीपद कोणाला? याविषयी चर्चा सुरू आहे.

बाळासाहेबांची शपथ घेऊन, सांगतो हे ठरलं होतं : संजय राऊत 

बच्चू कडू ताब्यात, राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही? 

काय म्हणाले नवाब मलिक?
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी सविस्तर खुलासा केला आहे. एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. मलिक म्हणाले, 'काँग्रेस सध्या सरकारचा अजेंड काय असेल? याविषयी आग्रही आहे. आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांचे मुद्दे घेऊन पुन्हा शिवसेनेशी चर्चा केली जाईल. त्यानंतर शिवसेनेचे मुद्दे असतील, त्याचाही विचार होईल आणि त्यानंतर सरकार स्थापनेची पुढची दिशा ठरेल.' मलिक म्हणाले, 'तीन पक्ष एकत्र आले तरच, सरकार स्थापन होईल यात कोणतिही शंका नाही. सरकार बनवणं हा विषय नाही तर ते पाच वर्षे चालवायला ही लागेल. त्यामुळं तिन्ही पक्षांनी एकमेकांचा मान राखला पाहिजे. शिवसेनेचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळं मुख्यमंत्री त्यांचाच होईल. शिवसेनेचा मान राखला पाहिजे. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेसनं सत्तेत यावं, अशी आमची इच्छा आहे. पण, काँग्रेस सरकारच्या किमान समान कार्यक्रमासाठी आग्रही आहे.'

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुख्यमंत्री शिवसेनेचाच!
शिवसेने खासदार संजय राऊत सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे सांगत आहेत. सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात येत असली तरी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मिळत असलेल्या संकेतांनुसार मुख्यमंत्री शिवसेनेचाच होण्याची चिन्हे दिसत आहे. जयपूरहून मुंबईत आल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे संकेत दिले होते. 'ज्या पक्षाचे जास्त संख्याबळ असेल त्यांचाच मुख्यमंत्री होईल,' असे वडेट्टीवार यांनी विमानतळावर मीडियाशी बोलताना म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra political updates ncp clarification state will have cm of shivsena