बच्चू कडू ताब्यात; राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज दुपारी राजभवनावर मोर्चा काढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. राजभवनावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मुंबई : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, राज्यपालांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) राजभवनावर मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी त्यांना पत्र पाठवून राष्ट्रपती राजवटीत मोर्चा काढता येत नाही असे सांगत बच्चू कडूंसह आंदोलकांना ताब्यात घेतले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज दुपारी राजभवनावर मोर्चा काढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. राजभवनावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

छः महीने दिए हैं, बनाओ भाई सरकार!; अमित शहांचे उघड आव्हान

त्यापूर्वी, बच्चू कडू यांनी राज्यपालांच्या मुंबईतील राजभवन या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल असे सांगितले होते. मदत जाहीर करावी यासाठी हा मोर्चा  राज्यपालांच्या बंगल्यावर काढण्यात आला होता. मलबार हिल पोलिस ठाण्याचे निरीक्षक निळकंठ पाटील यांनी पत्र पाठवून मोर्चाला परवानगी नाकारली होती. 

नव्या आघाडीसाठी जोरबैठका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bacchu Kadu arrested for protest on farmers in Mumbai