मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा (Jayant Patil Resignation) दिल्याच्या बातम्या आज सकाळी काही वृत्तवाहिन्यांवर झळकल्या. यासोबतच आमदार शशिकांत शिंदे यांना नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाईल, अशीही माहिती काही माध्यमांनी दिली.