esakal | भाजपाच्या विखारी प्रचाराला दोन लाख "गांधीदूत' उत्तर देणार; कॉंग्रेस नेत्यांचे प्रतिपादन

बोलून बातमी शोधा

भाजपाच्या विखारी प्रचाराला दोन लाख "गांधीदूत' उत्तर देणार; कॉंग्रेस नेत्यांचे प्रतिपादन}

भाजप हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपच्या या विखारी प्रचाराला आता कॉंग्रेसचा सोशल मीडियाही सज्ज झाला आहे.

भाजपाच्या विखारी प्रचाराला दोन लाख "गांधीदूत' उत्तर देणार; कॉंग्रेस नेत्यांचे प्रतिपादन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई  : भाजप हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपच्या या विखारी प्रचाराला आता कॉंग्रेसचा सोशल मीडियाही सज्ज झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे दोन लाख "गांधीदूत' भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

कॉंग्रेसच्या सोशल मीडिया मोहिमेचे उद्‌घाटन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ आदी उपस्थित होते. राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले, मात्र त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजप आज समाजात तेढ निर्माण करत आहे. परंतु त्यांना आता कॉंग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल. भाजपकडून केला जाणारा अपप्रचार कॉंग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल आणि सत्य माहिती जनतेसमोर आणेल, असे पटोले यांनी सांगितले. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पटोले यांची सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट 
नाना पटोले यांनी गुरूवारी सकाळी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर दादर येथील जैन मंदिराला भेट दिली. चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण केल्यानंतर त्यांनी माहीम दर्गा येथे जाऊन चादर अर्पण केली आणि माहीम चर्चला भेट दिली. तसेच पटोले गुरु तेग बहादूर नगर येथील दशमिरा दरबार गुरुद्वारा येथे जाऊन अभिवादन केले. 

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण कार्यक्रम उद्या 12 तारखेला ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यास नाना पटोले पुष्पहार अर्पण करून विधानभवन येथील महापुरुषांना तसेच दक्षिण मुंबईतील महापुरुषांना ते अभिवादन करतील. हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. त्यानंतर मंत्रालयापासून ट्रॅक्‍टरने गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास करतील. तेथे लोकमान्य टिळक पुतळ्यास तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तेथून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत बैलगाडीने प्रवास करतील.  

-------------------------------------------------------------

 ( संपादन - तुषार सोनवणे )

maharashtra politics marathi BJPs vicious propaganda Gandhi Doots will answer political