बहुमत सिद्ध केल्यानंतरही, राजकारणाला वेगळं वळण शक्य; काय आहे शक्यता?

बहुमत सिद्ध केल्यानंतरही, राजकारणाला वेगळं वळण शक्य; काय आहे शक्यता?

महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन करत महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली. आज विधानसभेत भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ आणि मंत्र्यांची शपथ त्याचबरोबर घेतलं गेलेलं आजचं कामकाज देखील संविधानाला अनुसरून नाही अशी भूमिका मांडली. या सर्व गोंधळात भाजपकडून मतदानावर बहिष्कार टाकत सभात्याग करण्यात आला. 

दोन दिवसाच्या या विशेष अधिवेशानात आजचा दिवस जेवढा गोंधळाचा राहिला तेवढाच उद्याचा दिवस देखील गोंधळाचा राहण्याशी शक्यता आहे. उद्या सभागृहात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अशातच आता या सर्व प्रक्रियेत एक नवीन ट्वीस्ट येऊ शकतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार बहुमत चाचणी साठी गुप्त मतदान पद्धत न अवलंबता शिरगणती करत मतदान घेण्यात आलं. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी असा कोणताही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही. 

नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड ही गुप्त पद्धतीने घेण्यात येते. अशात उद्या पार पडणाऱ्या विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त पद्धतीने न घेता उघड पद्धतीने घेतली जाईल की काय अशी भीती भाजपला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड ही गुप्त पद्धतीने घेण्याचा खरतर नियम आहे. अशातच आता उद्या कोणत्या पद्धतीने उद्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करण्यात येणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

एकीकडे भाजप म्हणतेय की, गुप्त मतदान न करता, सरकार नियमांची पायमल्ली करतेय. तर उद्या क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी  विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सरकार गुप्त मतदान टाळणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण गुप्त मतदानात भाजपने बाजी मारली तर बहुमत सिद्ध केल्यानंतरही राजकारणाला वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळू शकतं.   

विश्वासदर्शक ठरावाआधी अध्यक्षांची नेमणूक केली जावी अशी देखील भाजपची मागणी होती. मात्र सरकारकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आढावा देत आज हंगामी अध्यक्षांच्या उपस्थितीत बहुमत चाचणी घेण्यात आली. दरम्यान आता उद्या विधानसभेत काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

Webtitle : maharashtra politics may go to different direction even after winning floor test in house 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com