Raj Thackeray : पुण्यासह मुंबईत मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : पुण्यासह मुंबईत मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार?

Raj Thackeray News : राज्यात येत्या काळात प्रमुख महानगरपालिकांच्या निवडूकांचे बिगूल वाजणार असून, त्याआधी कोणकोणत्या पक्षांची युती होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्वामध्ये मनसेची भूमिका नेमकी काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून, आगामी निवडणुकांसाठी मनसेची काल मुंबईत सात तास बैठक झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत निवडणूकीबाबत चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा: Video : मोदी-शाह नव्हे,'यांच्या'मुळे झालो मुख्यमंत्री; CM शिंदेंचा चर्चेला पूर्णविराम

आगामी महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिका नेकमी काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी त्यात काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि बाजप नेत्यांच्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा होती.

हेही वाचा: BJP : पंकजा मुंडेंच्या विधानाने भाजपात नाराजी; मुनगंटीवारांकडून मात्र पाठराखण

मात्र, काल मुंबईत उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची सात तास बैठक पार पडली यामध्ये आगामी महानगर पालिका निवणुकीसाठी मनसे भाजप सोबत जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळेआगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढविणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात, पुण्यासह मुंबई, नवी मुंबई यासारख्या अनेक शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, या सर्व ठिकाणी मनसे एकला चलो रे च्या भूमिकेत असल्याचे पार पडलेल्या बैठकीतील चर्चेवरून दिसून येत आहे.

हेही वाचा: Lata Mangeshkar : ...म्हणून त्यांच्याबद्दल कुठेच बोललो नाही; लतादीदींच्या आठवणीत राज ठाकरे भावूक

नागपूरात काय म्हणाले होते राज ठाकरे?

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते. त्यावेळी हा विदर्भ सर्वात पहिले काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, आज जर हा भाजपाचा बालेकिल्ला झाला असेल तर, तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांच्या हाती आला आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहूनच अनेक पक्ष मोठे होतात. प्रत्येक ठिकाणी अनेकांना प्रस्थापितांच्या विरोधातच उभं राहावं लागतं. त्यामुळे जर नागपूरात जर भाजप प्रस्थापित असतील तर, त्यांच्या विरोधातच लढावं लागेल असे विधान राज ठाकरेंनी केले होते.

त्यांच्या या विधानामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपममध्ये युती होणार अशी जी चर्चा सुरू होती ती फिस्कटली का? असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.