
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय संजय शिरसाट सध्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आहेत. आयकर विभागाने त्यांना २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या शपथपत्रात दाखवलेल्या संपत्तीत झालेल्या कोट्यवधींच्या वाढीच्या स्पष्टीकरणासाठी नोटीस पाठवली आहे.
यासोबतच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरण उघडकीस आणत शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या असून, महायुती सरकारमधील अंतर्गत गँगवॉरची चर्चा जोरात आहे.