

Maharashtra Pollution Control Board Action
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि प्रदूषणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ प्रकल्पांकडून १.८७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर चार प्रकल्पांना टाळे ठोकण्यात आले.