आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे File photo

'आम्ही दुसऱ्या लाटेची नाही तर...'आदित्य यांचं महत्त्वाचं विधान

नेमकं काय म्हटलय आदित्य ठाकरेंनी
Published on

मुंबई: सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये स्थिती चिंताजनक आहेच. पण त्याचवेळी देशातील अन्य राज्यातही परिस्थिती फार चांगली नाहीय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी, कोरोना व्हायरसची तिसरी लाट लवकरच येऊ शकते असे विधान केले आहे.

तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी प्रखर किंवा कमकुवत असेल, हे आत्ताच सांगता येऊ शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आता लसीकरणाची मदत होत नसली, तरी भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने मदत होईल असे आदित्य यांनी सांगितले. "मागच्यावर्षी आम्ही कोविड टास्क फोर्सची स्थापना केली. त्यांच्या मतांच्या आधारावर आम्ही निर्णय घेतोय. राजकीय नाही तर वैज्ञानिक आणि वैद्यकीय तथ्य तपासून निर्णय घेतले जात आहेत" असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण खात्याचा कार्यभार आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

आदित्य ठाकरे
कोरोना फोफावतोय! २४ तासात आढळले २.६१ लाख नवे रुग्ण

"कोरोनाची सद्य स्थिती दडवून काही होणार नाही. आम्ही आता तिसऱ्या लाटेची तयारी करतोय. आमच्याकडे पाच लाख बेड्स असून ७० टक्के ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था आहे" असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काल राज्यात ६७,१२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. ४१९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून ६० हजार मृत्यू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com