

School Nutrition Smuggling To Foreign
ESakal
तुर्भे : राज्यातील शालेय पोषण आहारासाठी पुरवण्यात येणाऱ्या तांदळाची आफ्रिकेतील काही देशांमध्ये तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या डीपीईएमएस विभागामार्फत शालेय पोषण आहार पुरवठ्याचा ठेका मेसर्स जे. बी. ग्रेन्स डिलर्स असोसिएशन ट्रस्टचे अध्यक्ष अनिलकुमार गुलाबचंद गुप्ता यांना देण्यात आला आहे. या ठेक्याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अध्यक्ष अनिलकुमार गुप्ता यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.