

.MSRTC Spare Parts Procurement Under Scanner Vijay Wadettiwar Alleges Purchases at 30 Percent Above Market Rates in Maharashtra
sakal
मुंबई: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांची खरेदी बाजारभावापेक्षा तब्बल ३० टक्क्यांहून अधिक दराने केला जात असल्याने महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.