

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एसटी च्या आगारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना परिवहमंत्र्यांनी उघड केल्याने खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी परळ येथील एसटी बस डेपोची अचानक पाहणी केली असता, एक बस चालक दारूच्या नशेत ड्युटीवर असल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे मंत्री सरनाईक यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तात्काळ त्या चालकाला निलंबित करण्याचे आदेश दिले.