

Maharashtra Child Rights Commission
ESakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची नुकतीच बैठक झाली. बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करून आश्रमशाळा व निवासी संस्थांमधील संपूर्ण सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय तपासणी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही समिती संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी पाहणी व तपासणी करून अहवाल आयोगास सादर करणार आहे.